आनंद वाटा आनंद लूटा !!

 हरिपाठ एकादशावर्तन म्हणजे ११ आवर्तन करणार्या नामधारकाच्या हातून खालील पांच गोष्टी सहज घडतात.



 
 



विश्व संत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या मधुर आवाजात




जीवन विद्येच्या नामधारक यांच्या आवाजात संगीतबद्ध हरिपाठ गायन



हरिपाठ एकादशावर्तन म्हणजे ११ आवर्तन करणार्या नामधारकाच्या हातून खालील पांच गोष्टी सहज घडतात.🙏🏻🙏🏻
१: ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथांची आवर्तने करण्यांत त्यांची सेवा घडते.
२: ग्रंथात भगवन्नाम 'खच्चून' भरलेले असल्यामुले ग्रंथाची आवर्तने करीत असतांना नामघोष होतो व त्या द्वारे भगवंताची सेवा घडते.
३: ग्रंथातील नामाचे तत्वज्ञान अंत:करणात बिंबते.
४: ग्रंथात केलेला हरिनामाचा उपदेश अंत:करणात ठसतो.
५: हरिपाठात माऊलींनी सांगितलेली नामस्मरणाची गोड फळे प्राप्त 



हरिपाठाची उपासना करणार्या नामधारकाला जी फलप्राप्ती होते,तिचे वर्णन माऊलींच्या शब्दांतच खालीलप्रमाणे दिले आहे
१.तेणे मुक्ती चारी साधियेल्या.
२.पुण्याची गणना कोण करी.
३.वेदशास्र उभारी बाह्या सदा.
४.द्वारकेचा राणा पांडवा घरी.
५.भरला घनदाट हरी दिसे.
६.तुटेल धरणे प्रपंचाचे.
७.द्वैताचे बंधन न बाधिजे.
८.नामापाठे मौन प्रपंचाचे.
९.परंपरा त्याचे कुल शुद्ध.
१०.पले भूतबाधा भेणे याचे.
११.रम्य रमले समाधान.
१२.कलिकाल त्यासी न पाहे दृष्टि.
१३.पापाचे कलप पलती पुढे.
१४.म्हणती जे वाचा तया मोक्ष.
१५.पाविजे उत्तम निजस्थान.
१६.तयासि लाधली सकल सिद्धी.
१७.सिद्धी बुद्धि धर्म हरिपाठी आले.
१८.येणें दशदिशा आत्माराम.
१९.पवित्रचि होय देह त्याचा.
२०.तपाचे सामर्थ्य तपिन्नला.
२१.चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे.
२२.सकल ही घडले तीर्थाटन.
२३.हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य.
२४.हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले.
२५.यमें कुलगोत्र वर्जियेले.
२६.दोन्ही पक्ष पाही उद्धरती.
२७.रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण.
२८.लक्ष्मी वल्लभ तया जवली.
२९.भुक्ति मुक्ति चारी घरी त्याच्या.
३०.हरिसी करुणा येईल तुझी.
३१.समाधी संजीवन हरिपाठ.

अशा या अलौकिक हरिपाठाचा व त्यांत उपदेशीलेल्या दिव्य हरिनामाचा लाभ घेवून प्रत्येकाने आपल्या जन्माची सार्थकता करावी हीच संत मायबापांची तीव्र इच्छा होय.


॥ एक ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥

॥ दोन ॥
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न भाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

॥ तिन ॥
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

॥ चार ॥
भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

॥ पाच ॥
योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥

॥ सहा ॥
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥

॥ सात ॥
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

...............................

 


Comments

Popular posts from this blog

मनसे एम्प्लॉयमेंट पोर्टल

सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन........